प्रेयसीच्या मदतीने केला तिच्या पतीचा खून

 लातूर जिल्ह्यातील रेणापूर जवळ खरोळा नावाचे गाव आहे, या गावात लखन उर्फ संदीप बालाजी राऊतराव वय (30) वर्ष आणि मनीषा वय (26) यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
 त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. लग्नाच्या थोड्याच दिवसानंतर लखन व मनीषा मध्ये चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होत होते. मनीषाला तिचा नवरा दीर व सासरा वारंवार त्रास देत होते, अशी माहिती तिने तिच्या आई-वडिलांना दिली होती.  जसजसे दिवस जात होते तसतसा त्यांच्या घरात चालत  असलेला वाद जास्त होत होता 27 मे रोजी मनीषाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
 ही माहिती तिच्या सासर्‍याने मनीषा च्या वडिलांना फोन द्वारे कळवली होती, मग तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिचा पती लखन राऊतराव व त्याचा भाऊ त्यांच्या विरुद्ध रेणापुर पोलिसांनी 31 मे रोजी गुन्हा दाखल केला. 
या गुन्ह्यामध्ये आरोपी असणाऱ्या लोकांपैकी मनीषा चा दीर व सासर्‍याला अटक करण्यात आली होती. परंतु मनुष्याच्या पती लखन हा 26 मे म्हणजे मनीषा आत्महत्या करणे अगोदर एक दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस व त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते,  मनीषा आत्महत्येनंतर पोलिसांनी तपास केला असता, पोलिसांना अशी माहिती मिळाली की,  मनीषा  व त्यांच्याच गावात असलेला विजय छपरे यांचे प्रेमसंबंध होते. पुढील चौकशी करता पोलिसांनी विजय छपरेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. परंतु त्याचा बनाव पोलिसांच्या पुढे जास्त काळ टिकून राहू शकला नाही. पोलिसांनी आपला हिसका दाखवताच त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली. 
 चौकशी झाल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर त्यांनी केलेले करते उघडे पडले आहे, असा त्याला पश्चाताप झाला आता आपली अब्रू गेली, या भीतीपोटी विजय छपरे ने  सहा जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावात काय घटना घडत आहेत, त्यामुळे गावकरी लोक व पोलिस तर चक्रावून गेले होते मनिषाच्या  आत्महत्या नंतर  लगेचच विजयची आत्महत्या  सर्वात महत्वाचे म्हणजे मनीषा च्या आत्महत्या च्या अगोदर एक दिवस तिचा नवरा  बेपत्ता होता,
या गोष्टींचा धागादोरा पोलिसांना सापडत नव्हता.  शेवटी सोमवारी 8 जून रोजी दुपारी गावाजवळ असलेल्या विहिरीत पोत्यात बांधून टाकलेला लखन चा मृतदेह पोलिसांना सापडला, लखनचा  मृतदेह पोलिसांना सापडल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी विद्यानंद काळे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे गतिमान करून, लखन चा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याचा व आपली इज्जत जाऊ नये म्हणून, विजय व मनीषाने आत्महत्या केल्याचा पोलिसांनी निष्कर्ष काढला. 
 मंगळवारी 9 जून रोजी या प्रकरणी मनीषा व विजय यांच्याविरुद्ध
गुन्हा रजिस्टर नंबर 395/ 2020 कलम 302, 201 भा. द. वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांनी सांगितले. दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी अवघ्या सहा तासात लावला.  जनतेकडून संबंधित पोलिस   अधिकाऱ्यांचे  जनतेतून कौतुक केले जात आहे.

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा