मानवत / प्रतिनिधी.प्रविण घागरे
मानवत येथील पी. एम. श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सात दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीर १८ डिसेंबर २४ डिसेंबर या कालावधीत पार पडले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये श्री. विशाल धिंगे कराटे मास्टर प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेषतः मुलींना स्वसंरक्षण आणि शारीरिक विकास या उपक्रमांत र्गत भव्य कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात सकाळ सत्रातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या एकूण ६२५विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. माणिक घाटूळ यांच्या संकल्पनेमुळे विशेष आयोजन करण्यात आले.
या कालावधीत विद्यार्थ्यांनी कडाक्याच्या थंडीत देखील भरघोस प्रतिसाद देऊन शिबिराची यशस्विता दिसून आली पूरक हालचाली कवायती आणि कराटेचे धडे विद्यार्थ्यांना आत्मसात करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली २४ डिसेंबर रोजी या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक श्री विशाल धिंगे सर यांचे आभार व्यक्त केले शालेय अभ्यासा बरोबरच शारीरिक क्षमता आणि विकास अत्यावश्यक असल्याचे श्री. विशाल धिंगे यांनी आपल्या मनोगत व मार्गदर्शनातून सांगितले शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ आणि सर्व शिक्षक वृंद यांनी विशाल धिंगे यांचा यथोचित सन्मान करून ऋण व्यक्त केले आजच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण करण्यासाठी असे प्रशिक्षण अत्यावश्यक असल्याचे मत अध्यक्षीय समारोपात माणिक घाटूळ यांनी सांगितले या संपूर्ण शिबिरास संदीप काळे, सुरेश सातपुते, राजकुमार लांडे, श्रीमती सत्यभामा गिरी, गुलाब लाड, ज्ञानेश्वर निपाणीकर, सुरेश पवार, मनोज वांगीकर, वसंत वांगीकर, रावसाहेब चिंचाने, परमेश्वर बोडखे, शिवाजी पालवे, दत्ता ठोंबरे, श्रीमती सुनिता जोशी झाडगावकर आणि सोनय्या कीर्तनकार या सर्वांचे सहकार्य लाभले.


0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा