> शेतकऱ्यांची तहसील प्रशासनाकडे मागणी; अन्यथा अमरण उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
____________________________________
मानवत / प्रतिनिधी.प्रविण घागरे
तालुक्यातील मौ. सावरगाव खु. येथील गट क्रं १३३ व १३४ च्या नंबर धुऱ्यावरुन रस्ता मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रकरण दाखल केले आहे. प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी २७ फेब्रुवारी २०२५ आदेश रद्द करुन नव्याने रस्ता देण्यासाठी आदेशीत केलेले आहे. परंतु अद्याप ही रस्ता खुला करुन दिला नाही त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी उपोषनाचे हत्यार उपसले असून गट नंबर 135 मधुन पाळोदी, सोनुळा, सावरगाव (खु) शिवारातील गट क्रं 135 मधील ओढयातुन पाणी आंबेगाव (चा) तळयाला जाते सदर ओढा हा पंधरा फुट खोल व तीस फुट रुंद ४ आहे. या ओढयामुळे गट नंबर 135 मधील शेतीची वहीती आम्हाला करता येत नाही व ओढयातून शेती उपयोगी साहित्य घेऊन जाता येत नाही त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ प्रकरणकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचा प्रलंबीत प्रश्न सोडवावा अन्यथा 30 डिसेंबर पासून कार्यालया पुढे अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर बाबाराव साखरे, नारायण साखरे, शंकर साखरे, मारोती साखरे, लक्ष्मण साखरे, अर्जुन साखरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा