कंटेनमेंट झोन ला पालकमंत्री देशमुख यांची भेट!!!

लातूर शहरातील बाबा नगर, खाडगावरोड कंटेनमेंट झोन परीसरात शनिवारी रोजी भेट देऊन पाहणी केली. या कंटेनमेंट झोन मध्ये कोवीड१९ चा प्रादूर्भाव वाढू नये याकरीता सर्व प्रकारची काळजी घ्यावी, जनतेची गैरसोय होवु नये म्हणून त्यांना सर्व सोयीसुवीधा पुरविण्यात याव्यात असे निर्देश यावेळी प्रशासन, महापालीका, आरोग्य, पोलीस तसेच इतर संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

येथील नागरिकांशी चर्चा करून त्यांना धीर दिला, काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगून दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या, तेथे उपस्थित अधिकारीसह सर्वांना याठिकाणी कंटेनमेंट झोनच्या सर्व नियमांचे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत.



यावेळी कंटेनमेंट झोनमधील नागरिक, तेथे कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, मनपा स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथी औषधाच्या गोळ्याचे वितरण करण्यात आले. कंटेनमेंट झोन परीसरासातील नागरीकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यांना जीवनाश्यक लागणारे साहित्य मिळणे बाबत काळजी घेण्याच्या सुचना मनपा प्रशासनास दिल्या आहेत. 
यावेळी  महापौर विक्रांत गोजमगुंडे,  नगरसेवक बालासाहेब देशमुख, आयुब मणियार उपस्थित होते

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा