पिंपळे सौदागरमध्ये रविवार (दि.7 रात्री तरूणाचा खून हा आंतरजातीय प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी सहा जणांना अटक करून अॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेमंत काटे, सागर काटे, जगदीश काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे (सर्व रा. पिंपळेसौदागर) अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. विराज विलास जगताप (वय २०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विराज जगताप हा आरोपी जगदीश काटे यांच्या मुलीवर प्रेम करत होता. विराज आपल्या मुलीवर प्रेम करतो ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हेमंत काटे, सागर काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे या सर्वांनी ७ जून रोजी रात्री दहा वाजता विराजवर हल्ला केली. दुचाकीवरून जाणाऱ्या विराजचा आरोपींनी टेम्पोतून पाठलाग करून पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ त्याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर हेमंत काटे, सागर काटे, जगदीश काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे या आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगड घेऊन विराजला बेदम मारहाण केली.
‘तुझी लायकी आहे का माझ्या मुलीवर प्रेम करायची, तरी तू माझ्या मुलीवर प्रेम करतो’, असं म्हणून आरोपी त्याच्या अंगावर थुंकले आणि लोखंडी रॉड विराजच्या डोक्यात घातला. बेदम मारहाणीमुळे विराज जागेवर बेशुद्ध पडला. विराज बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी बेशुद्ध अवस्थेत विराजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा