थोर समाज सुधारक आणि क्रांतिकारकांच्या बलिदानावरील स्वातंत्र्याचा विकास केला नाही

 थोर समाज सुधारक आणि क्रांतिकारकांच्या  

बलिदानावरील स्वातंत्र्याचा विकास केला नाही 

 - माधवराव गायकवाड


लातूर, दि.२३, थोर समाज सुधारक, त्यागी संत आणि महान क्रांतिकारकांच्या बलिदानावर प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याचा खरा विकासही येथे आम्ही करू शकलो नाहीत, असे प्रतिपादन माजी सरपंच श्री माधवराव गायकवाड यांनी केले. ते २३ फेब्रुवारी रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यान लातूर येथे, आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंती दिनी, प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गणपतराव तेलंगे हे होते.
          जयभारत प्रभाती मित्र परिवार, सकाळ सत्र समूह व महाराष्ट्र राज्य परिट-धोबी समाज संघटनेच्या वतीने, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, सामूहिक अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माधवराव गायकवाड पुढे म्हणाले की, राष्ट्र संताना येथे केवळ भक्ती तर समाज सुधारकांना फक्त सुधारणा आणि कांतिकारकांना निव्वळ कागदी स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते. तर त्यांना भक्कम असे एकसंघ राष्ट्र उभे करून ज्ञानी, समतावादी व प्रगतशील मानवी समाज निर्माण करावयाचा होता. मात्र प्रत्यक्षात येथे तसे कांही झाले नाही.अज्ञान, अंधश्रद्धा, विषमता व अनिष्ट रूढी-पंरपरेतून येथे दारिद्र्यच कायम राहिले. एवढेच नव्हे तर, क्रांतिकारकांनी स्वबलिदान देऊन आपणास बहाल केलेले स्वातंत्र्यही, आम्ही योग्य प्रकारे सांभाळू शकलो नसल्याने, भावी पिढ्या आणि इतिहास आम्हास माफ करणार नाही, अशी खंत श्री गायकवाड यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुख्याध्यापक श्री प्रकाश मुळे व श्री शिवाजीराव गायकवाड चिखलीकर यांचीही, समायोचित अशी भाषणं झाली.
           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकुमार रायवाडीकर यांनी केले. आणि अमोल सुर्यवंशी यांनी सुत्रसंचालन तर कामराज गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी श्री प्रकाश बंडापल्ले, श्री महादेव तेलंग, श्री वसंतराव वंजारे, के.एम.भडीकर, दिलीपराव सातपुते, श्री दिगंबर बारसकर, सुनील कांबळे, श्री गोरोबाकाका शिंदे, प्रा.सुभाषराव पासमे,मधुकर कांबळे, सुशांत टेकाळे, दामोधर नाळापुरे, बाबुराव बोळशेटे, हरिश्चंद्र घोलप, राजपाल गायकवाड, सुयश राजेगावकर, वसंतराव सुर्यवंशी, दिलीप गायकवाड, श्री रामचंद्र ढगे, श्री शामजी        वरियाणी, पैलवान दगडूसाहेब लांडगे, विकास कांबळे, श्री विजय चव्हाण व श्री पिंटू चन्नागीरे आदी उपस्थित होते.


0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा