मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे
मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २३ डिसेम्बर रोजी सकाळी १० वाजता आपत्ती व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय अपत्त्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ) च्या वतीने मेजर यादव यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकां सह आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय लाड होते. तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक श्री. विश्वनाथ बुधवंत, गट साधन केंद्राचे गिरी , माणिकराव सिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मार्गदर्शन कार्यक्रमास मानवत शहरातील शकुंतला कांचनराव कत्रूवार, श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालय, कस्तूरबा गांधी विद्यालय, केंद्रीय प्राथमिक शाळा व इकरा उर्दू स्कूल येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मेजर यादव यांनी भूकंप, पूर, आग, रस्ता अपघात, गॅस गळती अशा आपत्तींच्या वेळी स्वतःची व इतरांची सुरक्षितता कशी राखावी, प्राथमिक उपचार कसे द्यावेत, अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन का आवश्यक आहे, या बाबत सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यां मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर देण्यात आला. व एनडीआरएफचे कार्यप्रणाली यावर मार्गदर्शन केले एनडीआरएफ ही देशातील आपत्ती व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष प्रशिक्षित केंद्रीय दल आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच मानव निर्मित दुर्घटनांमध्ये जीवित व मालमत्तेची हानी कमी करणे, बचाव कार्य, शोधमोहीम, प्राथमिक उपचार तसेच जनजागृती हे एनडीआरएफचे प्रमुख कार्य आहे. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे नागरिकांना आपत्तीपूर्व तयारीचे महत्त्व पटवून देणेही एनडीआरएफ करते असे सांगितले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत, शिवराज नाईक, बाळ नाईक, माणिक सिसोदे, सुनील लाड, श्रीकांत सूर्यवंशी यांच्या सह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अशा उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.



0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा