कोरोना अपडेट लातूर :- त्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा अखेर मृत्यू !!!

 देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात दिनांक 09.06.2020 रोजी खाडगांव रोड लातुर येथील  रहिवाशी कोरोना (कोविड 19) पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे  रुग्ण दाखल झाला होता. सदर रुग्ण पुनम नगर ( अंधेरी) मुंबईवरुन प्रवास करुन आला होता. या रुग्णाचे पाच वर्षापूर्वी किडनी प्रत्यारोपण झाले होते व हा रुग्ण प्रत्यारोपणानंतर डायलिसीस व Immunosuppressants उपचार चालू  होते. या रुग्णालयात त्याचे दोन वेळा डायलिसिस करण्यात आले व मागील ०४ दिवसापासुन हा रूग्ण व्हेंटीलेटर वर होता . या रुग्णाचा उपचारादरम्यान दिनांक 15.06.2020 रोजी सायंकाळी ठीक 4.40 वा. मृत्यु झाला अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा