टीव्ही मालिका ते बॉलिवूड सुपर स्टार असा यशस्वी प्रवास अवघ्या कमी कालावधीत करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती नोकराकडून प्राप्त होताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुशांतच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडली. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे दम घोटला गेल्या मुळे झाला आहे हे त्याच्या पोष्टमार्टम रिपोर्ट मधुन सिद्ध झाले आहे.
सुशांत हा एक लोकप्रिय अभिनेता होता. एकमुद कमी कालावधीत त्याने स्वत:ची बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून आपल्या केली. ‘किस देशमू में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली टीव्ही मालिका होती. त्या मालिकेनंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला अभिनयाची संधी मिळाली अन् त्याचे भाग्य चमकले. या मालिकेमुळे सुशांत प्रचंड लोकप्रिय झाला. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये इंट्री घेतली.
‘काय पो छे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रेषकांनी प्रचंड कौतुक केले. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो पुन्हा झळकला. तसं पाहता सुशांतची बॉलिवूडमध्ये खरी ओळख ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने झाली. हा चित्रपट भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनी यांच्या जीवनावर आधारीत होता. यात त्याने धोनीची भूमिका साकारली होती. आपल्या उत्तम अभिनायाने त्याने धोनीची भूमिका पडद्यावर जिवंत ठेवली अन् या चित्रपटाने इतिहास रचला.
असा हा सुपर स्टार सुशांत सिंग रजपूत सर्व आठवणी मागे सोडून आपल्यातून निघून गेला.
0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा