यल्लोरी मधे कोरोनाचे आगमन..





औसा, तालुका लातूर  आज मिळालेल्या माहितीनुसार 

लातुर 25 पैकी 24  निगेटीव्ह 01पॉझिटीव्ह                         
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 07.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 25 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती औसा तालुक्यातील येल्लोरी येथील असून मुंबई येथून प्रवास करून आलेली आहे. त्यांना ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे असून त्यांना  निमोनिया असल्याचे कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालय, निलंगा 01,  औसा 08, कासारशिरसी 01 असे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह  आले  आहेत
असे लातुर जिल्हयातील एकुण 25 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी  24  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे  अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर .दिली यांनी 

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा