आरे बापरे..... गोलाई सिल झाली !!!


सर्वांच्या दिलाची धडकन असलेली, लातूर जिल्ह्याची शान असलेली गोलाई आज दिनांक 16/06/2020 रोजी सिल करन्यात आली. गोलाई पासून आवघ्या काही अंतरावर सराफ लाईन आहे. या ठिकाणी प्रतिष्ठित व गाजलेले सोनाराचे दुकान म्हणजे "ताथोडे सराफ" या दुकानाच्या समोर "कोटलवार किराणा स्टोअर्स" नावाचे दुकान आहे. 
       या किराणा दुकानात आज दोन कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. काही कालावधी नंतर नगर पालीकेकडून या भागात सॕनिटायझर ची फवारणी केली. व हा परिसर निर्जंतूकीकरन करन्यात आला. 
    या संदर्भातील खुप मोठ्या प्रमाणात काही फोटो खुप वेगाने वायरल होत आहेत. त्या वायरल होनाऱ्या फोटो या सोबत दिसून येत आहेत.

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा