पुणे ग्रामीण एटीएस व सिंहगड रोड पोलिसांची संयुक्त कारवाई !!!
पुणे : व्यावसायिकाची हत्या करून फरार झालेल्या आरोपींना
पुणे ग्रामीण एटीएस व सिंहगड रोड पोलिसांची संयुक्तरीत्या गजाआड केले. सदर कारवाई एटीएसच्या पथकातील मोसिन शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सिंहगर रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती एटीएसच्या पथकाने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह खेड शिवापुर परिसरात गस्त करीत असताना दहशतवाद विरोधी पथकाचे मोसिन शेख यांना गोपनीय बातमी मिळाली की, नऱ्हे पुणे शहर येथील एका व्यावसायिकाचा खून करून फरार झालेले आरोपी संतोष रामचंद्र नाक्ती (28, रा. गावडदरा, ता. हवेली, जि. पुणे) व सुधीर राजाराम कामठे (24, रा. कुसगाव, ता. भोर, जि. पुणे) दोन्ही आरोपी कुसगाव तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी एका शेतामध्ये झोपडीवजा घरांमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर माहिती स्थानिक सिंहगड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांना दिली. दोन्ही पथकाने सापळा लावून संतोष व सुधीर यांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी दोघांना सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले सिंहगड रोड पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू पवार, पोलीस नाईक विशाल भोरडे, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा