मग लॉकडाऊन असताना भावड्याचे यार दोस्त गोळा झाले. एलआयसी कॉलनी भागातील रस्त्यावरच ही सगळी तयारी करण्यात आली. केक कापला आणि भावड्याचा वाढदिवस साजरा करताना फटाकेही वाजवले. फटाक्यांच्या आवाजाने एलआयसी कॉलनी दणाणून गेली. आणि काही कळण्यापूर्वीच त्याच ठिकाणी शेतकरी अर्जुन शेंडगे यांनी रिकाम्या प्लाटमध्ये रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीला आग लागली.
सेलिब्रेशन करताना आग, लातुरात सहा लाखांच्या कडब्याची राख
Date - जून ०६, २०२०
Social
लातुरातील एका भावड्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना सहा लाखाची राख अवघ्या काही मिनिटांत झाली आहे. त्याचं झालं असं लातूरचे काही तरुण एकत्र येत एलआयसी कॉलनी भागात वाढदिवस साजरा करत होते. या भावड्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे असे अनेक संदेश सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
वीस हजार कडब्याची गंज रचून ठेवण्यात आली होती. जिची किंमत अंदाजे सहा लाख आहे. या आगीत संपूर्ण गंज जळून खाक झाली. त्या भागात दूरपर्यंत ही आग दिसत होती. याची माहिती लोकांनी तात्काळ या भागातील नगरसेवक आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार ,नगरसेवक सुनील मलवाड यांना दिली. त्यामुळे यंत्रणा लवकर कामाला लागली. नंतर तीन अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.मात्र या गडबडीत तो बर्थडेवाला भावड्या कोण होता हे मात्र कोणीही सांगायला तयार नव्हता. भावड्याच्या वाढदिवस साजरा झाला. जाळन धूर संगटच निघाला. यात शेतकऱ्याला सहा लाखाचा फटका बसला. मात्र ते तरुण आणि वाढदिवस ज्याचा होता तो भावड्या धुरासारखे गायब झाले आहेत. आता कॉलनीतील रहिवासी आणि पोलिस त्यांना शोधत आहे.
Share this
Related Articles :
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
News Highlits
-
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 10.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 56 व्यकतींचे स्वॅब तपासणीसाठी आले ह...
-
> शेतकऱ्यांची तहसील प्रशासनाकडे मागणी; अन्यथा अमरण उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा ____________________________________ मानवत / प्रतिनिध...
-
मानवत / प्रतिनिधी.प्रविण घागरे मानवत येथील पी. एम. श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सात दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीर १८ डिसेंबर २...
-
यवतमाळ जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांसह हत्येचे सत्र सुरुच असून मागील चार महिन्यात खुनाच्या तब्बल 15 घटना घडल्या आहेत. पहिली घटना आशी आहे की कौटु...
0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा