जातीय द्वेषातून बौद्ध तरुणांवर हल्ला !!!

परभणी : साळापूरी, ता. पूर्णा, जि. परभणी. येथे जातीय द्वेषातून बौध्द तरुणांवर हल्ला..
      जातीयवादी तरूणींनी सुनियोजीत कट करून #रणखांबे कुटूंबातील तरुणांवर हल्ला केला हा हल्ला जिवघेना असुन येथे पोलीस यंत्रणेचा बेजवाबदारपणा स्पष्ट होतो. 
साळापूरी हे गावं जातीय अत्याचाराने गांजलेले हे गाव आहे.तरी पोलीसांच्या नाकर्तेपनामुळे येथे जातीयमतभेदामधून वारंवार हल्ले हे होतंच असतात.
आज रोजी ०८/०६/२०२० रोजी नारायण रणखांबे(२७)व जय रणखांबे (२१)ह्या दोघांवर अज्ञातस्थळी जिवे मारण्याच्या भावनेतून हल्ला करण्यात आला हल्ला करणारे १)गोपाळ गरूड २) कृष्णा गरूड ३) महेश उर्फ किरण ज्ञानोबा घाडगे यांनी आपल्या १०-१५ साथीदाराच्या सहाय्याने हल्ला केला...
“काळ आला होता पण वेळ आली नव्हती”
असेच म्हणतां येईल ह्या हल्यात नारायण रणखांबे व जय रणखांबे हे दोघेही गंभीर जखमी झाले असुन असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
 तरी दैठणा पोलीस स्टेशन येथे आज ९/६/२० रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे ...तरी हल्ला झाल्यापासून गुन्हा नोंदवन्यास पोलीस टाळाटाळ करत होते तरी, ही माहीती मिळताच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यामध्ये संतापाची लाट उसळली व पोलीस स्टेशनवर दबाव टाकण्यास सुरवात झाली.. युथ पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय मुख्य संघटक अमोलजी सोनटक्के, महाराष्ट्र संपर्क प्रमुख ऋषीकेश वानखेडे,विदर्भ अध्यक्ष सुरेंद्र काळे,विदर्भ प्रमुख गौतम खंडारे,विदर्भ संघटक विशाल इंगोले लातूर जिल्हा अध्यक्ष अविनाश सुर्यवंशी, अकोला जिल्हा अध्यक्ष विनोद सिरसाठ व इत्तर पदअधीकारी व कार्यकर्ते यांनी पीडीत कुटूंबाशी सविस्तर चर्चा करून स्थानिक पोलिस स्टेशनवर दबाव टाकताच आज रोजी ०९/०६/२०२० ला गुन्हा नोंद करून कार्यवायी करण्यास भाग पाडले.
युथ पॅंथर संघटनेबरोबरच इत्तर आंबेडकरी संघटनेनी सक्रीय सहभाग नोंदवत ह्या प्रकरणात स्थानिक पोलीस यंत्रणेचा भोंगळ कारभार पहात दबाव टाकून करवाही करण्यास भाग पाडले....!

 तरी, युथ पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष : मा. भाऊसाहेब कांबळे यांनी आंबेडकरी जनतेला आव्हान केले की,आंबेडकरी तरूणांने व समाजाने एकत्र यायला हवे व महाराष्ट्रातील व देशांतील सुरू असलेले जातीय हल्ले थांबवन्यासाठी व वाढत असलेले दलितांवरील अन्याय अत्याचार थांबवन्यासाठी एकजूट होवून ही मनुवृत्ती हानून पाडावी...

2 टिप्पणी(ण्या):