महाराष्ट्रात आजपासून अनलॉकच्या तिसरा टप्पा सुरू झाला. हळूहळू महाराष्ट्र 'अनलॉक' होत असताना करोनाचा संसर्ग काही कमी होताना दिसत नाहीये. आज राज्यात आज १०९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला
महाराष्ट्रात आजपासून अनलॉकच्या तिसरा टप्पा सुरू झाला. हळूहळू महाराष्ट्र 'अनलॉक' होत असताना करोनाचा संसर्ग काही कमी होताना दिसत नाहीये. आज राज्यात आज १०९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील ६४ रुग्णांचा समावेश आहे. मुंबईनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये -२, उल्हासनगर १, वसई- विरार-१ , भिवंडी-१ आणि ठाण्यात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना बळींची एकूण संख्या ३१६९ इतकी झाली आहे. आज राज्यात दिवसभरात २५५३ नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ८८ हजार ५२५ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४६. २८ टक्के इतके आहे. तर, मृत्यू दर ३. ५७ टक्के आहे.
0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा