प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक वर्षा काळे यांच्या दिलदारीस सलाम !!!


लोकांसाठी सध्या कोरोना संसर्गामुळे अनेक सामाजिक संस्था, संघटना, तसेच दानशूर व्यक्ती समोर येऊन गरजवंतांना जमेल तशा पद्धतीने आर्थिक तसेच धान्य स्वरूपामध्ये मदत करत आहेत. अशाच पद्धतीने रोकडा सावरगाव येथील वर्षा कल्याण काळे या मुलीने आपल्या नोकरीचा पहिला पगार गरजवंतांना दिला.     

       याबद्दल मिळालेली सविस्तर माहिती अशी की रोकडा सावरगाव येथील रहिवासी वर्षा कल्याण काळे या हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन एमपीएससी तून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झाल्या आहेत. त्या सध्या नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत मात्र सध्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉक डाऊन केल्यामुळे एमपीएससीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी मुंबई, पुण्यामध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम  एम पी एस सी स्टुडंट राइट्स या संस्थेच्या माध्यमातून केले जात असते. तसेच या संस्थेच्या माध्यमातून सध्या लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांना जेवण पुरवले जात आहे. त्यामुळे वर्षा कल्याण काळे यांनी आपला पहिला पगार या संस्थेला व मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल सरपंच उज्वला जाधव, उपसरपंच नाथराव रोकडे, चेअरमन दिपक राव जाधव, भाऊसाहेब जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक वाघ, बालाजी रोकडे, शिवकुमार गोटे मुरुडकर, प्रवीण जाधव, विठ्ठलराव जाधव, बाबन आत्ता, विनायकराव जाधव,  युवराज घोगरे तसेच गावातील नागरिकांनी यांचे  कौतुक केले आहे.

1 टिप्पणी(ण्या):