लातूर जिल्हा कोरोना अपडेट!!! एक पॉझिटिव्ह चार जण गंभीर


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातील २८ व्यक्तींचे स्वॅब सोमवारी (ता.आठ) तपासणीसाठी आले होते. त्यातील २२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
लातूर  : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातील २८ व्यक्तींचे स्वॅब सोमवारी (ता.आठ) तपासणीसाठी आले होते. त्यातील २२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती ही उदगीर येथील आहे, असे संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले. दरम्यान, या आधी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या शहरातील पाच रुग्णांची स्थिती अतिगंभीर आहे, असेही सांगण्यात आले.
संस्थेतील प्रयोगशाळेत तपासणी आलेल्या २८ व्यक्तींच्या स्वॅबमध्ये संस्थेत तपासणीसाठी आलेल्या १३ व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता. त्यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल अंतिम आला नाही. एका व्यक्तींचा स्वॅब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालय (उदगीर) येथून एकुण १३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी दहा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन  व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत, तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कोविड केअर सेंटर येथून दोन व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते. त्यापैकी एका व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
दरम्यान, संस्थेत उपचार घेत असलेल्या १४ रुग्णांवर विलगीकरण व  अतिदक्षता कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. यात पाच रुग्णांची स्थिती अतिगंभीर आहे. त्यामध्ये भाग्य नगरमधील एक, मोती नगरमधील दोन रुग्ण, कादरी नगर (औसा), येल्लोरी (ता. औसा) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या पाच रुग्णांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना फुफुसाच्या दोन्ही बाजूस निमोनिया आहे. यातील कादरी नगर (औसा) येथील रुग्णास मधूमेह असून उच्च रक्तदाब व किडनीचा विकार आहे. या रुग्णाचे सोमवारी (ता.आठ) डायलिसीस करण्यात आले. इतर दोन रुग्णांना उच्च रक्तदाब, दमा आहे तर एका रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाब आहे. दुसऱ्या एका रुग्णांस फक्त उच्च रक्तदाब आहे, कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख  डॉ.मारुती कराळे, डॉ.निलिमा देशपांडे यांनी दिली. सध्या कोरोनाबाधितांची एकुण संख्या १४९ झाली असून यातील २४ जणांवर उपचार सुरू आहेत. तर १२१ जण बरे झाले आहेत. उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना मीटर
एकुण बाधीत  : १४९
उपचार सुरू असलेले : २४
बरे झालेले : १२१
मृत्यू : ०४

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा