लातूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मार्चपासून टाळेबंदी सुरू आहे. या टाळेबंदीच्या काळात शहरात पोलिसांनी ३१ हजार १८७ नागरिकांवर कारवाई करीत एक कोटी नऊ लाख रुपयांचा दंड केला आहे. ही सर्वांत मोठी कारवाई आहे. इतका दंड आकारूनही अद्यापही लातूरकर कोरोनाच्या संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. यात नागरिकांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशात ता.२२ मार्चपासून टाळेबंदी सुरू आहे. लातूर शहरात पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. टाळेबंदीच्या काळात पोलिसांच्या वतीने नागरिकांना रस्त्यावर विनाकारण फिरू नये, घरात बसावे असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते.

आता लोकांनी काय करावे काय माहीत इकडून अनलॉक 1.0 चालू आणि इकडे सांगळे साहेबांचे लोकडाऊन 7.0 चालू आता लोकांनी काय करावे
उत्तर द्याहटवा