लातूर शहरातील पहिले कोरोना बाधित क्षेत्र लेबर कॉलनी होते. या कॉलनीमध्ये 22 मे रोजी कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सदर क्षेत्र सील करण्यात आले होते.
प्रशासनाने हा परिसर सील करूण 14 दिवस संचारबंदी जाहीर केली होती. गेल्या 14 दिवसात या परिसरात बाधित रुग्ण आढळला नाही. शिवाय नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. प्रत्येक घरांचे निर्जंतुकीकरण केले. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची यादी करून त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. प्रत्येक घरांत जाऊन थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. त्याला यश आले असून, कालावधी पूर्ण झाल्यानंतर 5 जुन रोजी हा परिसर खुला करण्यात आला.

0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा