*मनपा च्या वतीने रोपांचे वाटप*



जागतिक पर्यावरण दिन व वटसावित्री पोर्णीमेचे औचित्य साधून लातूर महानगरपालिकेच्या वतीने कंटेनमेन्ट झोनमध्ये घरोघरी वडाच्या रोपट्यांचे वितरण करण्यात आले. 
       यंदा जागतिक पर्यावरण दिन व वटसावित्री पोर्णिमा एकाच दिवशी आली.  याचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी लातूर मनपा ने बाधित क्षेत्रातील प्रत्येक घरी वडाचे रोपटे वाटप करण्याची संकल्पना राबवली.  बाधित क्षेत्रातील नागयिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे महिलांना आपापल्या घरीच वटसावित्री पोर्णिमा साजरी करता यावी या अनुषंगाने रोपांचे वाटप करण्यात आले.  प्रत्येक कुटुंबाला एक रोप देऊन त्याची पुजा करुन परिसरात त्याची लागवड करुन संगोपन करण्यास सांगितले. 
      या वेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अनेक घरांना भेटी देऊन रोपांचे वाटप केले.

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा