मानवत येथे शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन


मानवत / प्रविण घागरे -
मानवत येथे दिनांक २३ मार्च रोजी संत सावता माळी चौक येथील जनशक्ती संपर्क कार्यालयात शहीद दिना निमित्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुस्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) चे जिल्हाध्यक्ष कॉ. आसाराम बुरखुंडे, सि.टू. कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. रामराजे महाडिक, केशव गोंडगे, आकाश ढगे, DYFI चे जिल्हासह सचिव अक्षय महाडिक, भारत मस्के, नागनाथ धबडकर, लक्ष्मण धुमाळ, यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होते.

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा