'लोकशाहीच्या मार्गातील खाचखळगे' या ग्रंथाचे डॉ.जे.एम.वाघमारे यांच्या हस्ते लातुरात प्रकाशन !


समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा लिखित
-----------------------------------------
'लोकशाहीच्या मार्गातील खाचखळगे' या ग्रंथाचे
डॉ.जे.एम.वाघमारे यांच्या हस्ते लातुरात प्रकाशन
----------------------------------------------------------
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन

        लातूर, दि.१,ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा लिखित, ' लोकशाहीच्या मार्गातील खाचखळगे ' या पुस्तकाचे प्रकाशन, थोर साहित्यिक तथा समीक्षक, संस्थापक कुलगुरू व माजी खा. डॉ. जे. एम. वाघमारे यांच्या हस्ते, मंगळवार ५ एप्रिल रोजी सांयकाळी ५.३० वाजता, बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन वाचनालय क्रिडासंकूल लातूर येथे होणार असून, ज्येष्ठ विधिज्ञ व समाजवादी नेते अड. मनोहरराव गोमारे हे अध्यक्षस्थानी राहणार असून, या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन, संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
          लातूर येथील विचारशलाका आणि शेती व ग्रामीण विकास संशोधन मंडळ आसू यांच्या सौजन्याने, समता दर्शन प्रकाशन बार्शी यांनी हे पुस्तक काढलेले आहे. लेखक पन्नालाल सुराणा यांनी, 'लोकशाहीच्या मार्गातील खाचखळगे ' या पुस्तकात अतिशय महत्वपूर्ण मांडणी केलेली आहे. दीर्घ इतिहास व सशक्त असे मार्मिक संदर्भ,म.गांधीजींच्या स्वप्नातील स्वातंत्र्य ,भारतीय संविधान व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यावरील, विचार व कृती ऐक्याचे यात अत्यंत समर्पक भाष्य केले आहे. भारतीय स्वातंत्र्य, लोकशाही व सध्य राजकीय स्थितीबाबत जागरूक अभ्यासक, कार्यकर्ते, जबाबदार नागरीक व विद्यार्थ्यानी हे पुस्तक हाताळणे महत्वाचे आहे.५ एप्रिलला सांयकाळी ५.३०. वाजता बाबासाहेब परांजपे फाऊंंडेशन वाचनालय क्रिडा संकूल लातूर येथे, माजी खा.डॉ.जे.एम.वाघमारे यांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ तथा समाजवादी नेते अड. मनोहरराव गोमारे हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर यावेळी थोर समाजवादी विचावंत पन्नालाल सुराणा, अभ्यासक प्रा.डॉ.सुशीलाताई पिंपळे व थोर व्याख्याते तथा संपादक डॉ.नागोराव कुंभार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.आणि प्रसिद्ध अभ्यासक प्रा.डॉ.अशोक नारनवरे हे वाचक मनोगत मांडणार आहेत.
         तेव्हा या कार्यक्रमास नागरीक व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उत्तरेश्वर बिराजदार, रामकुमार रायवाडीकर, प्राचार्य हरिष देशपांडे, विलास वकील, सुर्यकांत वैद्य, सुनीता अरळीकर, पांडुरंग देडे,भाऊसाहेब उमाटे, गुंडू पवार, वलीसाहेब शेख, भारतीताई लामतुरे, नजीऊल्ला शेख, विलास खाडे, प्रा.डॉ.दशरथ भिसे, श्यामजी वरियाणी, सुधीर भोसले, शिरीषकुमार शेरखाने, दिलीप अरळीकर, संजय व्यवहारे, अड.सुरेश शिंदे, सूरज पाटील आदीनी केले आहे.
              

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा