-------------------
लातूर, ( प्रतीनिधी ) दि.५, ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्याने, आज ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लातूरच्या पार्कवरील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास, विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून, सामूहिक अभिवादन केले.
महाराष्ट्र राज्य परीट- धोबी संघटना, समता श्रमिक संघर्ष समिती, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य दलित शेतकरी संघटना व भूमिहीन सरकारी जमीनधारक शेतकरी संघटना आदींचा सहभाग होता. यावेळी अड. डी एन भालेराव, गणपतराव तेलंगे, गोपाळराव चिकाटे, श्याम वरियाणी, शिरीषकुमार शेरखाने, संजय व्यवहारे, रामकुमार रायवाडीकर, मुरलीधर कांबळे, किरण लामतुरे, सूरज पाटील, भाऊसाहेब कांबळे, रोझा रायवाडीकर, प्रा.दिनकर कांबळे, अनिरुद्ध वाघमारे, पत्रकार बाळ होळीकर,अँड.मधुकर कांबळे, दगडू सोनवणे, बाबा शेख व अतुल कांबळे या कार्यकर्त्याचा समावेश होता.
कॅप्शन : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, सामूहिक अभिवादन करताना रामकुमार रायवाडीकर, श्यामजी वरियाणी, शिरीषकुमार शेरखाने, गणपतराव तेलंगे, संजय व्यवहारे आदी.

0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा