परिश्रमी व गुणवंत विद्यार्थी हेच खरे राष्ट्र आणि समाजाचे आधारस्तंभ !



परिश्रमी व गुणवंत विद्यार्थी हेच खरे
राष्ट्र आणि समाजाचे आधारस्तंभ !
--------------------------------------------
            - शिरीषकुमार शेरखाने
   
          लातूर, दि.१९, परिश्रमी व गुणवंत विद्यार्थी हेच खरे आपल्या राष्ट्र आणि समाजाचे भावी आधारस्तंभ आहेत असे मत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिरीषकुमार शेरखाने यानी १८ सप्टेबर रोजी, लातूर येथे कबीर रायवाडीकर यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
          या विद्यार्थी गौरव प्रसंगी बोलताना श्री शेरखाने पुढे म्हणाले की, प्रामाणिकता हा व्यक्तीमत्वातील एक महत्वाचा गुणालंकार आहे.आणि तो येथे सृजनशील संस्कारातूनच लाभला जातो.आणि असे ते संग्राहकच ज्या-त्या देशाचा अमूल्य असा एक सांपतिक ठेवा असतो, असेही ते म्हणाले. सीईटी परीक्षेमध्ये ७५ टक्के गुण प्राप्त करून, कबीर रायवाडीकर या विद्यार्थ्याने, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीमध्ये १७ वा क्रमांक मिळवला आहे. कोरोनामुळे नियमीत वर्ग होऊ शकले नसताना आणि जाणिवपूर्वक कसलिही खाजगी शिकवणी न घेता, सामान्य अर्थिकस्थिती असलेल्या श्रमजीवीच्यां वस्तीमध्ये वास्तव्य करून, चि.कबीर यांनी हे यश संपादन केले. तो शालेय स्तवरील स्कॉलर असून, या पूर्वी पण त्यांने अगदी अशाच अवस्थेमध्ये, दहावी बोर्ड परीक्षेतही आपले मेरीट सांभाळले होते. तो अत्यंत अभ्यासू , प्रामाणिक व गुणी विद्यार्थी आहे.
          या विशेष यशाबद्दल, ज्येष्ठ सेवानिवृत्त कला शिक्षक तथा समाजसेवक श्री शिरीषकुमार शेरखाने यांनी, लातूर येथील मातोश्री रमाबाई वस्तीमध्ये स्वतः  जाऊन, चि.कबीर रायवाडीकर याचा शाल-पुष्पबुके देऊन व पेढा भरून, त्याचा विशेष गौरव केला. दरम्यान अनिरुद्ध वाघमारे, संजय व्यवहारे, गोपाळराव चिकाटे, गणपतराव तेलंगे, भाऊसाहेब कांबळे, सूरज पाटील, वलीसाहेब शेख, प्रा.डॉ.अशोक नारनवरे, श्यामजी वरियाणी,अँड. डी.एन.भालेराव, अनिल दरेकर, बाबा हलकुडे, प्रा.डॉ. दशरथ भिसे,नजीउल्ला शेख,  मच्छिद्र गुरमे, बाळ होळीकर,सुधीर भोसले, रघुनाथ बेडदे, नितीन गायकवाड, प्रा.सुभाष पासमे, डी.ए. सोनवणे, वैजनाथ गायकवाड,साहित्यिक प्रा.रामकिशन समुखराव आदींनी कबीर यांचे अभिनंदन केले. यावेळी सुरैय्या रायवाडीकर, रोझा रायवाडीकर व रामकुमार रायवाडीकर आदी उपस्थित होते.
सोबत : १)सीईटी परीक्षेचे गुणपत्रक,२०२२. 
           २) सत्कार फोटो,
                   ------------------
कॅप्शन : सीईटी परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या, कबीर रायवाडीकर या गुणवंत विद्यार्थ्याचा,ज्येष्ठ समाजसेवक शिरीषकुमार शेरखाने यांनी, स्वतः त्याच्या घरी जाऊन हृद्य सत्कार केला.या समयी सुरैय्या रायवाडीकर व रोझा रायवाडीकर.
                     

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा