मानवत / प्रतिनिधी.प्रविण घागरे
शहरातील दिव्य चैतन्य महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष श्री. के. टी. पटेकर होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दिक्षा प्रमोद कोर यांनी केले कार्यक्रमास मान्यवर म्हणून श्री. नितीन जेऊघाले, श्री. ए. एम जगाडे, श्री. संजय पवार व श्री मुसाळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली त्यानंतर अश्विनी नाटकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. साहिबजाद्यांच्या शौर्यगाथेवर आधारित माहितीपर व्हिडिओ सादर करण्यात आला. इलेक्ट्रिशियन विभागातील प्रशिक्षणार्थी कुमारी आदिती भोसले व शाम झुटे यांनी मनोगत व्यक्त करून धैर्य, देशप्रेम व कर्तव्याची भावना अधोरेखित केली. त्यांच्या उल्लेखनीय सहभागा बद्दल उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री ए. एम. जेऊघाले यांनी गुरु गोविंदसिंह महाराजांच्या चार वीर पुत्रांच्या बलिदानाची शौर्यगाथा प्रभावी शब्दांत मांडली. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाली. या नंतर अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष श्री. ए. एम. पटेकर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, निष्ठा व शिस्त यांचे महत्त्व सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांनी शौर्य शपथ घेऊन देशसेवेचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. पवन बाभुळकर यांनी केले सर्वांच्या सहकार्यामुळे हा वीर बाल दिवस कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमास एकूण १०४ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तसेच शिल्प निदेशक श्री वल्लमवड, श्री. पवन बाभुळकर, सौ. वंदना खैरनार, श्री गुरु स्थळे व श्री. परमेश्वर गिरी, मधुसूदन सोनवळकर यांनी उपस्थिती दाखवली.

0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा