**
*माहिती तंत्रज्ञान युगात विद्यार्थी हे सर्व गुण संपन्न असले पाहिजेत*
> श्रीमती रश्मी खांडेकर
> सावळी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे उदघाट्न
______________________________________
मानवत / प्रतिनिधी.प्रविण घागरे
के.के. एम. महाविद्यालयाच्या वतीने सावळी येथे २६ डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव. श्री. बालकिशन चांडक, तर उद्घाटक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. रश्मी खांडेकर, संस्थेचे सहसचिव श्री विजयकुमार दलाल, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, सावळी ग्रामपंचायतचा सरपंच सौ. अनुजा काळे, उपसरपंच गोपाळ काळे, (आबा ) तंटामुक्त समिती अध्यक्ष गोविंद काळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब काळे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर (महाराज ) काळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव काळे, बाळासाहेब ( काका ) काळे, मा. अध्यक्ष अशोक कदम, आसाराम काळे (गुरुजी ) रामराव काळे शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाबुराव इक्कर, ग्रामविकास अधिकारी एम. के. विश्वंभर, डॉ. पंडित मोरे लांडगे नोडल ऑफिसर यांची उपस्थिती होती उद्घाटन पर भाषण करताना श्रीमती. रश्मी खांडेकर म्हणाल्या की माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी केवळ हुशारच नव्हे तर चारित्र्यवान, तंत्र स्नेही, सर्जनशील आणि समाजा भिमुख असला पाहिजे अशा सर्व गुणसंपन्न विद्यार्थ्यांमुळेच देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ घडू शकतो. आज केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विविध कौशल्यांचा समन्वय असलेला विद्यार्थीच यशस्वी ठरतो पोषण अन्न, खेळ, या बाबत ही विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप करतांना श्री. बालकिशन चांडक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रस्ताविक डॉ. भास्कर मुंडे यांनी. केले तर सूत्रसंचालन कार्य क्रमाधिकारी डॉ. एस. आर. राठी यांनी तर आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनीता कुकडे यांनी केले कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.
***

0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा