पतीचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडलं, पत्नीने जीव दिला; लातुरच्या आरतीची व्यथा

पतीचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध, तसेच, त्याच्या छळाल कंटाळून एका महिलेने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. लातुरातील या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस विवाह नंतर चालणाऱ्या अफेअरची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. एक्स्ट्रा मेरिटेअल अफेअर एक समाजातील स्टेटस सिम्बॉल बनला असल्या कारणामुळे अनेक ठिकाणी लग्नानंतरही बाह्य संबंध ठेवले जात आहेत. अशीच एक घटना लातूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
लातूरमध्ये एका पत्नीला आपल्याच पतीचे दसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलतानाचे चॅट्स सापडले आहेत. ते चॅट्स पाहून महिलेनं दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यतील वरवंती गावात घडली होती. आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आरती रामेश्वर उरगंडे असे आहे. ती आपला पती रामेश्वर सिद्धेश्वर उरगंडे, सासरे सिद्धेश्वर उरगंडे यांनीही या प्रकरणात त्यांचा मुलगा रामेश्वरला त्याच्या वडिलांचा पाठिंबा या एक्स्ट्रा अफेअरला असल्याचा आरोप आरतीच्या घरच्यांकडून करण्यात येतो आहे.

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा