अपंगांसाठीचा व्हीलचेअर थेट भंगारात विक्री; मानवत येथील धक्कादायक प्रकार* > शासकीय निधीच्या गैरवापराची दाट शक्यता !

 



मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे
अपंग व्यक्तींना अत्यावश्यक असलेली व्हीलचेअर थेट भंगारात टाकल्याचा धक्कादायक प्रकार मानवत शहरातील आठवडे बाजारात उघडकीस आला आहे विशेष म्हणजे या व्हीलचे अर नव्याकोऱ्या असून त्या वरील प्लास्टिकचे संरक्षक अच्छादन (मेनकापड) देखील काढलेले नव्हते, तरी ही त्या भंगारामध्ये फेकून दिल्याचे आढळून आले आठवडे बाजार परिसरातील भंगारात अपंग व्यक्तींना लागणाऱ्या साहित्याचा खच पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्हील चेअर, लोखंडी फ्रेम, चाके आणि इतर उपयोगी भाग अक्षरशः कवडी मोल दरात भंगारात टाकण्यात आले असल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले या साहित्या बाबत हे कोणत्या शासकीय विभागाचे की एखाद्या रुग्णालयाचे आहे ? असा सवाल उपस्थित झाला असून शहरात चर्चेला उधाण आले आहे. जर हे साहित्य शासकीय निधीतून खरेदी केलेले असेल, तर तो सरळसरळ शासकीय निधीचा गैरवापर ठरतो. दुसरीकडे, रुग्णालय किंवा आरोग्य यंत्रणेशी संबंधित असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे अनेक अपंग व्यक्ती आज ही व्हीलचेअरसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत असताना उपयोगात न आलेले आणि नव्यासारखे साहित्य भंगारात जाणे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे आणि अना गोंदी कारभाराचे ज्वलंत उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित विभाग, रुग्णालय किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच भंगारात टाकलेले साहित्य जप्त करून गरजू अपंग व्यक्तींना उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिक सामाजिक कार्यकर्ते व अपंग संघटनां कडून केली जात आहे. प्रश्न कायम: अपंगांच्या हक्कावर गदा आणणारे हे साहित्य नेमके कुणाच्या आदेशाने आणि कोणाच्या दुर्लक्षामुळे भंगारात गेले ? याची सखोल चौकशी होणार की प्रकरण नेहमी प्रमाणे बासनात गुंडाळले जाणार ? असा प्रश्न नागरिकांतुन निर्माण होत आहे.



**

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा