३ मे रोजी लातूर येथे, दयानंद कॉलेजच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये,५ वे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन पार पडले. या प्रसंगी अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्यावतीने उद्घाटन सत्रामध्ये, कांही विशेष निमंत्रित सत्कार करण्यात आले. मराठवाडा शिक्षक आमदार मा.विक्रमजी काळे यांच्या हस्ते, रामकुमार रायवाडीकर यांना शॉल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व अध्यक्षीय भाषण पुस्तीका देऊन, जाहीर सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विचारपीठावर संमेलन अध्यक्ष विलास सिंदगीकर, संजय मांजरमकर,डॉ.माधव गादेकर, राज्यकार्याध्यक्ष दंतराव व्यंकटराव, सुरेश पाटोळे, हरिलाल पोचय्या कांबळे, श्री कुचेकर, सुधाताई कांबळे, भानुदास कुडके, अड.टी.एन.कांबळे, प्रा. रामकिशन समुखराव व रमेश हनमंते याची उपस्थिती होती.
तर यावेळी दलित मित्र सुरेश चव्हाण, ज्येष्ट पत्रकार रामराव गवळी, एस एम तरुडे, के एम भडीकर, संजय व्यवहारे, कॉ. व्हि एम भोसले. श्याम वरियाणी, अॅड डी एन भालेराव, भाई प्रा. दत्ता सोमवंशी, पांडूरंग देडे, माजी सरपंच माधवराव गायकवाड आदी सहभागी झाले होते.

0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा