शेतक-यांच्या अन्नत्यागास झाले पूर्ण ३० दिवस
------------------------------------------------
टेबली लपा - छपींचे निव्वळ कागदी खेळ सुरुच
दोन निकाल व गैर बक्षिस दानपत्राचा विसर का?
------------------------------------------------
लातूर, दि.२५ , हिप्परसोगा ता.औसा येथील अन्यायग्रस्त वयोवृद्ध शेतक-यांच्या बेमुदत अन्नत्यागास तब्बल एक महिना उलटला तरी, संबधित टेबली बाबुंच्या लपवा- छपवीचे ते सराईत कागदी खेळ अद्याप सुरुच असून, मा.न्यायालयांच्या दोन निकालासह त्या बोगस बक्षिस दान पत्राचा त्यांना, सततच का व कसा विसर पडतोय ? असा प्रश्न उपस्थित करत, तहसिलदार व उपविभागीय महसूल अधिका-यांनी दुस-यांदा दिलेल्या, त्यांच्या पूर्णतः चुकीच्या, खोट्या व पक्षपाती अशा सदर अहवाल पत्रांच्या, बेमुदत अमरण उपोषणार्थिनी स्वतः २४ मे रोजी, मा.जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर जाहीर टरकाळ्या करून, अक्षरशः त्याचे बारीक-बारीक तुकडे वा-यावर भिरकावत उलट त्यांनाच परतवून,आंदोलकांनी आपली उद्गविग्नता दर्शविली.
भानुदास शंकर कांबळे ७२, मुरलीधर शंकर कांबळे ६७ व हणमंत शंकर कांबळे ६३ या तिघा भावांना, हिप्परसोगा येथे ३९ गटात वडिलोपार्जित मालकी- ताब्यात, ६ एकर १८ गुंटे जमीन आहे. त्या पैकी १ एकर २७ गुंटे जमीनीवर, शरीक भावकितील दुरच्या चुलत भाऊ मारोती सदाशिव कांबळे यांने, सन ८० मध्ये अचानकपणे जब्बरदस्तीने बेकायदा अतिक्रमण केले. त्यांनतर त्यांने ३८ गटामधील त्याची ३ एकर १७ गुंटे जमीन, एका शेतशेजारी पाटलास स्वतः विकली. आणि पुढे १९८५ साली त्यांने औसा न्यायालयात, या अतिक्रमीत जमीनीची मालकी मिळावी म्हणून स्वतः खटला दाखल केला.पण १९ ९१ साली हा निकाल सुद्धा त्याच्या विरोधी लागला. तरीपण, पुन्हा पुढे तो जिल्हा न्यायालयात गेला. तरीपण १९९८ ला हाही निर्णय पुन्हा त्याच्या विरोधात गेला. त्यामुळे संबधित खात्याने दि.७/४/२००५ रोजी सदर जमीनीची रितसर पाहणी, खुणा व पंचनामा केला. आणि प्रत्यक्ष ताब्यासह, या तिघा भावांना तशी ताबा पावती पण दिली.तरीपण त्या गैर इसमाने, औसा तहसिलदार, सज्जा तलाठी व अशाच कांंही सरकाारी लोकांना हाती घेतले.आणि पुढे कट कारस्थाने मा.न्यायालयांच्या दोन्ही निकालांची पायमल्ली करून, सन २००४ च्या सुमारास सदर जमीन परत परस्पर व बेकायदा आपल्या नावे करुन घेतले. कारण या सुद्धा जमीनीची त्यांना अशीच कोणासतरी गैर वि क्री करुन द्यावयाची होती.
याशिवाय, पुढे त्यांनी दि.२९/१२/२०२० ला कांही तशाच लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा त्याच जमीनीचे, एक बनावट बक्षिसपत्र परस्पर तयार केले. आणि त्या आधारे फक्त ५ दिवसाच्या आत, पुन्हा तहसिलदार व तलाठी यांनी ते क्षेत्र, त्या व्यक्तीच्या अन्य सदस्याच्या नावे चक्क दान केले. आणि परत त्यांनी त्याची आपल्या सरकार दप्तरी, दुस-यांदा बेकायदा नोंद केली. ते कांही येथेच थांबले नाहीत. तर या तहसिलच्या महसूली प्रशासनाने, सदर बोगस लोकांना त्याच जमीनीवर पिकविमा, पिकनुकसान भरपाई व शासनाच्या असेच इत्तर काही अनुदान- सवलती मिळवून देण्यासाठी सुद्धा, त्यांनी खास प्रयत्न अवलंबले. या तिघा शेतकरी भावांच्या बाजूनी निकाल लागून २४ वर्ष झाली. तर पुढे त्याप्रमाणे यांना ताबा पावती व पावती देऊन १७ वर्षे झाली. अशा प्रकारे हे गेली ४१ वर्ष, त्यांचा अन्याय सहन करत आहेत. शेवटी न्याय्य हक्कासाठी म्हणून त्यांनी
मा.जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर, दि.२६/४/२०२२ पासून बेमुदत अमरण उपोषण सुरु केले. त्यासही एक महिना होऊन गेला.यांना दोनदा रुग्णालयात पाठवले.मध्यंतरी अहवालाच्या नावे तलाठ्याच्या एका खोट्या पत्राआड, औसा तहसिलदारांना दडविले गेले. तेव्हा सत्याग्रहीनी ९ मेला सदर फसव्या कागदाची जाहीर होळी केली.
तरीही पुन्हा सदर महसुली लोकानी, मागील त्याच तारखेचे तेच खोटे कागदपत्रे एकत्रित करून, पुन्हा दि.२३/५/२०२२ या नव्या तारखेत उपोषणार्थींना दिले. तेव्हा सत्याग्रहींनी दि.२४/५/२०२२ रोजी आंदोलनस्थळी त्या फसव्या व चुकीच्या कागदाच्या, अक्षरशः फाडून जाहीर टरकाळ्या केल्या.आणि ती फाडलेली कागद तुकडे वा-यावर भिरकात त्यांनाच परत केले. आणि औसा तहसिल कार्यालयाच्या टेबली लपवा-छपवीच्या अर्धवट खेळाचा तीव्र धिक्कार करणारे निवेदन, शेतक-यांनी मा.मुख्यमंत्री, मा.महसूल आयुक्त व मा. जिल्हाधिका-यांना सादर केले. दरम्यान या कांही अन्यायी व बेजबादर अशा महसूली प्रवृतीचा सामाजिक कार्यकर्ते- रामकुमार रायवाडीकर, सूरज पाटील, अगंदराव कांबळे, श्यामजी वरियाणी, संजय व्यवहारे, वलीसाहेब शेख, शिरीषकुमार शेरखाने, अड. डी.एन.भालेराव, प्रा.दिनकर कांबळे,किरण लामतुरे,गणपतराव तेलंगे, गोपाळराव चिकाटे, अॅड.मधुकर कांबळे, अँड. सुरेश शिंदे, खय्यूम शेख, भाऊसाहेब कांबळे, बाबुराव झाकडे, रामदास ससाणे, बाबा शेख, शत्रुघ्न कांबळे, माधवराव गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी तीव्र धिक्कार केला आहे.

0 टिप्पणी(ण्या)
टिप्पणी पोस्ट करा