अखंड ३९ दिवसांच्या अमरण उपोषणाचे आता बेमुदत धरणे - आंदोलनात रुपांतर !



शासन-प्रशासनाप्रती शेतक-यांची नाराजी
----------------------------------------------------

कोर्ट निकाल न्यायसाठी निर्धार साखळी.
     
       लातूर, दि.३, दोन्ही मा.न्यायालयांच्या त्या स्वतंत्र दोन निकालांची, औसा तहसिल कार्यालयाने अमलबजावणी न करता, उलट सदर निर्णयाची पायमल्ली केल्यामुळे, अन्यायग्रस्त सर्वसामान्य गरीब शेतक-यानी न्यायाकरिता, सुरु केलेल्या अमरण उपोषणास ३९ दिवस झाले तरी न्याय मिळत नसल्याने, शासन- प्रशासनाप्रती आपली तीव्र नाराजी व्यक्त करत,अखेर त्यांनी आपल्या प्रदीर्घ अन्नत्यागाचे ३ जून रोजी दुपारी बेमुदत धरणे-आंदोलनात रुपांतर करुन, जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रहीनी निर्धार साखळी करून, न्यायाशिवाय आता कदापी माघार नसल्याचा संकेत दिला आहे.
            हिपरसोगा येथील भानुदास शंकर कांबळे, मुरलीधर शंकर कांबळे व हणमंत शंकर कांबळे या तिघा भावांना, गट ३९ मध्ये वडिलोपार्जित ६ एकर १८ गुंटे जमीन आहे. त्यातील १ एकर २७ गुंटे जमीनीवर,१९८० साली एका गैर इसमाने जब्बरदस्ती अतिक्रमण केले. त्याचा १९९१ साली औसा न्यायालयाने, यांच्याच बाजूने निकाल दिला. तरी त्या अतिक्रमिताने पुढे अपील केले. मात्र १९९८ साली सदर अपीलाचा निकाल पण पुन्हा त्याच्या विरोधात गेला. त्यामुळे मा.न्यायालयांच्या त्या दोन्ही निकाला नुसार सदर विभागाने, दि.७/४/२००५ रोजी त्या जमीनीची पाहणी, खुणा व पंचनामा केला.आणि या तिघांना त्यांच्या जमीनीचा कब्जा देऊन, तशी ताबा पावती सुद्धा दिली. मात्र तो अतिक्रमीत काही गप्प बसला नाही. त्याने तहसिलदार, तलाठी व इत्तर कांंही विभागाच्या लोकांना हाताशी घेतले. आणि न्या यालयांच्या दोन्ही आदेशांचा अवमान करुन,ती जमीन परस्पर व चोरून कागदोपत्री परत स्वतःच्या नावे करुन घेतली.आणि पुन्हा तशाच महसूली कर्मचा-यांच्या मदतीने, दि.२९/१२/२०२० रोजी एक बोगस बक्षिसपत्र बनविले. आणि त्याधारे फक्त ५ दिवसात तीच जमीन, परस्पर परत त्याच्याच मुलाच्या नावे कागदोपत्री नोंदवून घेतली.एवढेच नव्हे तर औसा तहसिलकडून, त्या बनावट कागदावर पिकविमा, पिकनुकसान भरपाई अशा शासकीय अनुदान-सवलती सुद्धा घेतल्याचे तेच सांगतात. 
            त्यापूर्वी सदर अतिक्रमीताने आपली अन्य गटातील स्वतःची सर्व जमीन, एका शेजारी पाटलास विकली.आणि यांच्याही त्या जमीनीचे असेच काही तरी करण्याचा त्याचा पक्का पूर्व इराधा होता. त्यासाठी तो या तिघा भावांना गेली ४१ वर्षे त्रास देत आहे. तेव्हा आपल्या त्या दोन्ही कोर्ट निकालाचे अखेर झाले तरी काय ? म्हणून, या ज्येष्ठ नागरीक शेतक-यांनी दि.२६/४/२०२२ पासून कडक उन्हामध्ये, मा.जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर बेमुदत अमरण उपोषण सुरु केले.त्यास अखंड ३९ दिवस लोटले. या काळात तहसिलदाराने त्यांना खोटी व अपूरीच कागद पत्र दिली. तर याना चार वेळा दवाखान्यात हलविले गेले. मात्र यांनी कांही अखेर उपोषण सोडले नाही. उलट त्यांनी तेथे बोंबाबोंब व जोडेमारो आंदोलनही केली.
           अन्यायग्रस्त शेतक-यांना ४०-४० दिवस अन्न त्याग करूनही, येथे त्यांच्या कोर्ट आदेशाची अमलबजावणी तहसिलदार काही करत नाही. त्यामुळे मा.शासन व मा.प्रशासनाप्रती तीव्र नाराजी दर्शवित, ३ जून रोजी दुपारी दोन पासून, या शेतक-यांनी आपल्या अमरण उपोषणाचे ३९ व्या दिवशी, बेमुदत धरणे- आंदोलनात रूपांतर केले. आणि पेन्डॉलवर या सत्याग्रहीनी निर्धार साखळी करून, न्यायाशिवाय आता माघार नसल्याचा एक संकेतच त्यांनी प्रशासनास दिला. तेव्हा मा.जिल्हाधिकारीसाहेब यांनी सदर गंभीर प्रकरणी स्वतः लक्ष घालून, या गरीब दलित शेतक-यांना तात्काळ न्याय द्यावा, अन्यतः यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यास येईल असा इशारा ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते- रामकुमार रायवाडीकर, संजय व्यवहारे, शिरीषकुमार शेरखाने, अंगदराव काबळे, प्रा.दिनकर कांबळे, श्यामजी वरियाणी, सूरज पाटील व भाऊसाहेब कांबळे आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.
                 --------------------------
सोबत: १) साखळी निर्धार सत्याग्रह फोटो, कॅप्शन : 
            मा.न्यायालयाच्या निकालांचा अवमान न करता, निर्णयांची कायदेशीर अमलबजावणी करून, 
अन्यायग्रस्त शेतक-यांना न्याय द्यावा म्हणून, गरीब शेतक-यांनी गेले ३९ दिवस अमरण उपोषण केले तरी, त्यांना न्याय मिळत नसल्याने मा.शासन व मा.प्रशासना प्रती तीव्र नाराजी व्यक्त करत, आता माघार नसल्याचे साखळी निर्धार आंदोलन करून,आपल्या अमरण उपोषणाचे, सत्याग्रहीनी बेमुदत धरणे - धरणे आंदोलनात रुपांतर केले.

0 टिप्पणी(ण्या)

टिप्पणी पोस्ट करा